Breaking News: भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी; जमीन, हवा, समुद्रात गोळीबार थांबला – परराष्ट्र सचिव

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी (सीजफायर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रात सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. आज शनिवार (दि. 10) सायंकाळी 5 वाजतापासून ही शस्त्रसंधी लागू झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी निवेदनात ही माहिती दिली.
Special briefing on Operation Sindoor (May 10, 2025) https://t.co/zxNK8mnY4w
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 10, 2025
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी ट्विटरवर म्हटले, “पाकिस्तान आणि भारताने तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपली संप्रभुता आणि प्रादेशिक अखंडता राखत शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत.”
Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect. Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity!
— Ishaq Dar (@MIshaqDar50) May 10, 2025
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी ट्विटद्वारे सांगितले की, गेल्या ४८ तासांत त्यांनी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहबाज शरीफ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्याशी चर्चा केली. “भारत आणि पाकिस्तानने तात्काळ शस्त्रसंधी आणि तटस्थ ठिकाणी व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या शहाणपणाची आणि शांततेच्या मार्गाची आम्ही प्रशंसा करतो,” असे रुबियो म्हणाले.
Over the past 48 hours, @VP Vance and I have engaged with senior Indian and Pakistani officials, including Prime Ministers Narendra Modi and Shehbaz Sharif, External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar, Chief of Army Staff Asim Munir, and National Security Advisors Ajit…
— Secretary Marco Rubio (@SecRubio) May 10, 2025
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी जाहीर केले की, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीवर सहमत झाले आहेत.





