BREAKING : भाजपच्या माजी मंत्र्याची गळफास घेऊन आत्महत्या

राजनादगांव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याच अद्याप कारण स्पष्ट झालं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवण्यात आलं होतं.

रविवारी संध्याकाळी रजिंदरपाल घरी एकटेच होते. कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी भाटिया यांनी गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रजिंदरपाल भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.