Salman Khan| बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला आहे. या गोळीबारात चार राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नेमकं काय घडलं ?
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकी आली. त्यानंतर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर करण्यात आले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला असून अज्ञातांचा तपास सुरू आहे.
याआधी दिली धमकी Salman Khan|
2023 मध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. सध्या सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. यातच आता थेट सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध ? Salman Khan|
दरम्यान, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज झालेल्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा: