Salman Khan । सलमान खानच्या घराबाहेर फॉरेन्सिक टीमचा तपास सुरु’ अभिनेत्याच्या घराबाहेर कोणी चालवल्या गोळ्या?
Updated On:

Salman Khan । आज पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला. मिळलेल्या माहितनुसार पहाटे ४.५१ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हवाई गोळीबार झाला.
सलमान खानच्या घराबाहेर हा गोळीबार कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांचे पथक आणि गुन्हे शाखेचे पथक सलमान खानच्या घराबाहेर पोहोचले असून तपास सुरू आहे. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.
मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला, त्यामुळे हल्लेखोरांची ओळख पटू शकली नाही. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सलमान खानच्या घराबाहेर 3 राउंड एरियल फायरिंग करण्यात आले.





