Breaking ! मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे

शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषेदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती असेलल्या मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुणे येथील बंगल्यांवर आज पहाटेच्या सुमारास अचानक ईडीचे छापे पडले असल्याने दिवसभर सुरु असलेल्या चौकशीने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर पूर्वी आयकर विभागाचा छापा पडला होता, त्यांनतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात बांदल काही दिवस कारागृहात गेलेले होते,
त्यांनतर त्यांची जामिनावर मुक्तता झालेली असताना मात्र आज सकाळी अचानकपणे मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुणे येथील बंगल्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला अचानक ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापे पडले असताना मंगलदास बांदल हे महम्मदवाडी येथील बंगल्यात असून त्यांची पत्नी तसेच मंगलदास यांचे दोन भाऊ या दोघांची शिक्रापूर येथील बंगल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असून याच वेळी शिवाजीराव भोसले बँकेच्या देखील दोन अधिकाऱ्यांच्या घरी ईडीने छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान सदर अधिकाऱ्यांनी छापे टाकल्याने पुणे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





