Dhurandhar 2 Box Office Collection : सध्या बॅाक्स अॅाफिसवर धुरंधर 2 (Dhurandhar 2 )या एकाच चित्रपटाची जोरदार हवा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. नवीन कोणताही बहुचर्चेत असलेला चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसानंतर चित्रपटाचे कलेक्शन 100 कोटींच्या पार होते. पण धुरंधर 2 ने एकाच दिवसात 100 कोटींचा टप्पा ओलांडून आजवरच्या सर्वच चित्रपटांना आस्मान दाखवले आहे. त्यामुळे हा टप्पा पार करणारा हा एकमेव बॅालिवूड चित्रपट ठरला आहे. Dhurandhar 2 Box Office Collection कित्येक दिवसांपासून धुरंधरच्या सिक्वलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्चला देशभरातील चित्रपटगृहात रिलीज झाला. हेही वाचा : Ashok Kharat case : …तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचं मोठं वक्तव्य 18 मार्चला विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रीव्ह्यू शोजला जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. कोणी कल्पनाही केली नसेल. त्याच दिवशी संध्याकाळच्या शोमधून देशभरात तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली. याचा फायदा दुसऱ्या दिवशी झाला. ज्यामुळे पहिल्याच दिवशी 100 कोटींचा जादुई टप्पा ओलांडत बॅाक्स अॅाफिसवर त्सुनामी आणली आहे. सॅकनिल्कच्या एका अहवालानुसार, चित्रपटाने देशात पहिल्याच दिवशी 103 कोटींची कमाई केली. जर यात बुधवार संध्याकाळच्या पेड प्रीव्ह्यूची कमाई जोडली, तर चित्रपटाची एकूण पहिल्या दिवसाची कमाई 146 कोटींपर्यंत पोहोचते. शनिवार आणि रविवार विकेंटचे दिवसे असल्याने या दिवसांत चित्रपट आकड्यांची मजल कुठेपर्यंत मारतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Dhurandhar 2 Box Office Collection जगभरातून मोठा प्रतिसाद Dhurandhar 2 Box Office Collection धुरंधर 2 ला केवळ भारतातच नव्हे, तर ओव्हरसीज मार्केट्समध्येही अत्यंत दमदार प्रतिसाद मिळाला आहे. अंदाजानुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी परदेशी बाजारपेठांमधून 5 मिलियन डॉलर्सहून अधिक कमाई केली. धुरंधर 2 च्या जगभरातील एकूण कमाईचा विचार केला तर, पहिल्याच दिवशी 220 कोटी रुपयांहून अधिक कमाईचा टप्पा गाठला आहे. हेही वाचा : Social Anxiety Disorder: लोकांसमोर बोलताना भीती वाटते? ‘सोशल एंग्झायटी डिसऑर्डर’ची असू शकते ही लक्षणं!