Football Red Cards : फुटबॉलच्या मैदानावर तुंबळ हाणामारी; रेफ्रीने दाखवले तब्बल ५३ रेड कार्ड, एकाच सामन्यात मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO
Football Red Cards : ब्राझीलच्या अंडर-२० फुटबॉल उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळाडू आणि अधिकारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली, ज्यात पंचांनी ५३ लाल कार्ड दाखवून ३६ कार्डांचा पूर्वीचा विक्रम मोडला.

53 Red Cards Shown In Brazil Under 20 Football Match Breaks World Record : फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंमधील वाद अनेकदा पाहायला मिळतात, मात्र ब्राझीलमध्ये एका सामन्यादरम्यान गोलच्या सेलिब्रेशनवरून इतकी भयंकर हाणामारी झाली की शिस्तीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. अंडर-२० स्टेट चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की, मैदानावरील रेफ्री फर्नांडो पॅट्रिक ड्रोशिक मोडेस्टो यांना एकूण ५३ रेड कार्ड दाखवावे लागले. या अभूतपूर्व घटनेसह एकाच फुटबॉल सामन्यात सर्वाधिक रेड कार्ड दाखवण्याचा जुना जागतिक विक्रम मोडला गेला.
गोलचे सेलिब्रेशन ठरले वादाचे कारण; खेळाडू एकमेकांवर धावून गेले
ही धक्कादायक घटना उबरलँडिया आणि मामोरे या दोन क्लबमधील उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात घडली. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये ५४ व्या मिनिटाला उबरलँडियाच्या खेळाडूला रेड कार्ड दाखवल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी थेट मैदानात घुसखोरी केली. त्यानंतर सामना तब्बल ४० मिनिटे थांबवावा लागला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर मामोरेच्या डावीने इंज्युरी टाईमच्या नवव्या मिनिटाला गोल करत ३-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, गोल केल्यानंतर त्याने विरोधी खेळाडूंना डिवचणारे सेलिब्रेशन केल्याने दोन्ही संघांचे खेळाडू थेट मैदानावरच एकमेकांना भिडले.
४३ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला रेड कार्ड; ३६ चा विक्रम मोडला
🚨 एक ही मैच में 53 रेड कार्ड!🟥⚽
फुटबॉल इतिहास का सबसे खौफनाक विवादित मैच, गोल के जश्न के बाद भड़की ऐसी जंग कि मैदान बना जंग का अखाड़ा। 36 रेड कार्ड का पुराना वर्ल्ड रिकॉर्ड टूटा!👇
https://t.co/4jbpNe5AOe
#ViralNews #FootballWorldRecord #BrazilFootball #RedCard #NavbharatLive https://t.co/GmHbNjYyKG— Priya Jais (@JaisPriya43256) November 6, 2026
मैदानावर उडालेल्या या अभूतपूर्व राड्यानंतर रेफ्रींनी शिस्तीचा बडगा उगारत एकूण ५३ जणांना रेड कार्ड दाखवले. यामध्ये ४३ खेळाडू, कोचिंग स्टाफचे ८ सदस्य आणि उबरलँडियाच्या २ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी एकाच सामन्यात सर्वाधिक ३६ रेड कार्ड दाखवण्याचा विक्रम होता, जो २०११ मध्ये अर्जेंटिनाच्या क्लेपोल आणि व्हिक्टोरियानो एरेनास यांच्यातील सामन्यात नोंदवला गेला होता. हा १३ वर्षे जुना विक्रम आता ब्राझीलमधील या सामन्याने मागे टाकला आहे.
ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड; उबरलँडियाचा सामन्यावर बहिष्कार
World Record Chaos: 53 Red Cards after mass brawl erupts during Brazil U20 football match https://t.co/AduipzlGXK
— Mario NoFool (@Gemwire99) November 6, 2026
सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना तिथेच थांबवावा लागला. सामन्यानंतर आपल्याला धमक्या मिळाल्याचे आणि मामोरेच्या ड्रेसिंग रूममध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याची तक्रार रेफ्रींनी आपल्या अधिकृत अहवालात नोंदवली आहे. या संपूर्ण वादानंतर उबरलँडिया संघाने बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यावर बहिष्कार टाकत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





