ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात ! विमान इमारतीच्या चिमणीला धडकले ; 10 जण ठार तर 12 पेक्षा जास्त जखमी

Brazil Aircraft Crash। ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात एक छोटे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांचा यात मृत्यू झाला तर 12 पेक्षा जास्त जखमी झाले असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. हा अपघात रविवारी झाला असल्याचे म्हटले जात आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “विमान प्रथम एका इमारतीच्या चिमणीला धडकले आणि त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले. यानंतर जवळच असलेल्या फर्निचरच्या दुकानात भीषण अपघात झाला. एरिया गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी या अपघाताविषयी माहिती दिली आहे. त्यांनी यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, “मी राज्य संरक्षण दलांसह ग्रामाडो याठिकाणी विमान अपघाताच्या ठिकाणी भेट दिली. आपत्कालीन दल सध्या घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहे.” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, विमानातील एकही प्रवासी जिवंत नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्य सार्वजनिक सुरक्षा कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, किमान 15 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Today A plane crashed in Gramado city of Brazil
The plane first hit the chimney of a building and then crashed into a furniture shop after hitting the second floor.#PlaneCrash#Brazil #Brazilplanecrash pic.twitter.com/4WLKOg3XEL
— 🇮🇳POOJA KUSHWAHA (@poojak1010) December 23, 2024
ग्रामाडोहून कॅनेलाला जात होते विमान Brazil Aircraft Crash।
स्थानिक माध्यमातील माहितीनुसार, विमान पाइपर चेयेन 400 टर्बोप्रॉप होते. ग्रामाडोहून कॅनेला शहराकडे उड्डाण केले. ते ख्रिसमससाठी फ्लोरियानोपोलिस या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जात होते. ग्रामाडो हे दक्षिण ब्राझीलमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे जर्मन वास्तुविशारद आणि सुंदर टेकड्यांसाठी ओळखले जाते. ख्रिसमसमुळे या शहरात उत्साह वाढला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात.
ब्राझीलमध्ये दोन दिवसांत दुसरी मोठी दुर्घटना Brazil Aircraft Crash।
ब्राझीलमध्ये दोन दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. याआधी शनिवारी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात बस अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला होता, तर 13 जण जखमी झाले होते. ही बस साओ पाउलोहून निघाली होती आणि त्यात 45 प्रवासी होते. या अपघातात एका कारचीही बसला धडक बसली, मात्र त्यात प्रवास करणारे तिघे सुखरूप बचावले.
हेही वाचा
Donald Trump: इलॉन मस्क यांच्याकडे सोपवणार राष्ट्रपतीपद? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…





