‘ब्रह्मास्त्र 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अयान मुखर्जीने दिली मोठी माहिती….

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता रणबीर कपूर , नागार्जुन, मौनी रॉय आणि आलीय भट्ट यांच्या बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसून आली होती. बॉक्स ऑफिसवर देखील हा सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला होता.
दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत या सिनेमाची धुरा संभाळणाऱ्या अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रेक्षणीय असेल.
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करायला आम्ही 10 वर्षे लावली तर आमचा सिनेमा पाहायला प्रेक्षक येणार नाहीत. येत्या दोन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल”. असं अयान मुखर्जीने सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सिनेमाचा दुसरा भाग खूपच रंजक असणार आहे.





