Jammu and Kashmir : निवृत्त IAS अधिकारी ब्रजराज शर्मा यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
Updated On:

श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी निवृत्त आयएएस अधिकारी ब्रजराज शर्मा यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
शर्मा यांनी 2015 ते 2017 या काळात जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
जम्मू आणि काश्मीर पंचायती राज कायदा, 1989 च्या कलम 36 च्या पोटकलम (3) च्या तरतुदीद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, नायब राज्यपालांनी ब्रजराज शर्मा यांची ही नियुक्ती केली.
ते वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत राज्य निवडणूक आयुक्तपदावर राहतील. या आधीचे निवडणूक आयुक्त के के शर्मा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 1 फेब्रुवारी 2023 पासून हे पद रिक्त झाले होते.





