Pune Crime News : प्रियकराने केली सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime News : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात प्रियकराने आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News : पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे आणि शुभम ज्ञानेश्वर कालबांडे हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. (Pune Crime News)
दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला. (Pune Crime News)
धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सकाळी त्याने स्वतः ११२ क्रमांकावर फोन करून हत्येची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले. (Pune Crime News)
मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Pune Crime News)
Pune Crime News : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला डेक्कनमधून अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई





