Boxing World Olympic Qualifiers 2024 : भारताच्या निशांत-सचिनची उपांत्यपूर्व फेरीत धडक….

World Olympic Boxing Qualification Tournament 2024 : भारताच्या निशांत देवने मंगोलियाच्या ओटगोनबाटार बियाम्बा अर्डेनाटोचा अवघ्या दोन मिनिटांत पराभव करत दुसऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड क्वालिफायरमध्ये 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये (प्री-क्वार्टर फायनल) प्रवेश केला आहे. मागील क्वालिफायरमध्ये कमी फरकाने ऑलिम्पिक कोटा गमावलेल्या देवने पहिल्याच मिनिटात प्रतिस्पर्ध्यावर पंचांचा सपाटा लावला आणि पहिला राऊंड संपायला 58 सेकंद शिल्लक असताना पंचांनी सामना थांबवला आणि निशांतला विजयी घोषीत केले.
World Olympic Boxing Qualifier (Bangkok): Nishant Dev advances into Pre-QF (71kg) with knockout win over Mongolian pugilist in 2nd round.
Just 2 wins away from securing Quota. #Boxing pic.twitter.com/rhqey69sXC
— India_AllSports (@India_AllSports) May 28, 2024
दुसरीकडे सचिन सिवाचने (57 किलो) दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या फ्रेडरिक जेन्सेनविरूध्द 5-0 ने विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी याच स्पर्धेत भारताच्याच अविनाश जामवालला 63.5 किलो गटात कोलंबियाच्या जोस मॅन्युएल वायफारा फोरीकडून 5-0 ने पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
World Olympic Boxing Qualifier (Bangkok): Sachin Siwach advances into Pre-QF (57 kg) with 5:0 win in 2nd round.
Just 3 wins away from securing Quota. #Boxing pic.twitter.com/5Qis34MmbQ
— India_AllSports (@India_AllSports) May 28, 2024
दरम्यान, निखत जरीन (महिला 50किलो), प्रीती (54 किलो) आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन (75किलो) यांनी 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारताने पॅरिस गेम्ससाठी आधीच तीन कोटा मिळवले आहेत. भारताने आणखी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी सात पुरुष आणि तीन महिलांना मैदानात उतरवले आहे.



