Mary Kom Retirement : “माझे विधान चुकीच्या पद्धतीने…” मेरी कोमकडून ‘त्या’ वृत्ताचे खंडन…

नवी दिल्ली – भारताची महान महिला मुष्टियुद्धपटू व सुपर मॉम मेरी कोम हीने आपल्या निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. जेव्हामला वाटेल की ऐआपण देशासाठी यापुढे सरस कामगिरी करु शकत नाही तेव्हा मी निश्चितच निवृत्त होइन परंतू सध्या जे माझ्या निवृत्तीबाबतचे वृत्त पसरत आहे हे खोटे आहे, असा खुलासा मेरी कोमने केला आहे.
सहा वेळा जग्गजेते पदावर नाव कोरणारी तसेच २०१२ साली भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमने निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाच्या नियमानुसार चाळिशी ओलांडलेल्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची संमती नसते. हा नियम असेलही मात्र, त्याचा असा अर्थ होत नाही की लगेचच मी निवृत्ती जाहीर करावी, असेही तीने म्हटले आहे.
Boxing champion Mary Kom says, “I haven’t announced retirement yet and I have been misquoted. I will personally come in front of media whenever I want to announce it. I have gone through some media reports stating that I have announced retirement and this is not true. I was… pic.twitter.com/VxAcFsq44v
— ANI (@ANI) January 25, 2024
मेरी कोमने जागतिक हौशी मुष्टियुद्ध स्पर्धेत सहावेळा जगज्जेतेपद मिळवले आहे. हा विक्रम साकारणारी ती एकमेव भारतीय महिला मुष्टियुद्धपटू ठरली आहे. तसेच मेरी कोमने जागतिक विजेतेपद स्पर्धेतही तब्बल सात वेळा पदक जिंकण्याच्या विक्रम साकारला आहे. २०१८ साली मणिपूर सरकारने तिच्या मीथोई लीमा ही उपाधी देऊन गौरवले होतं. मेरी कोमला पद्मश्री, पद्म भूषण, अर्जुन पुरस्कार आणि इतर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे.
मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित मेरी कोम नावाचा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने यात मेरी कोमचे पात्र साकारले होते. २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमधल्या ५१ किलो वजनी गटात तिने कांस्यपदक जिंकले होते. २०१४ साली दक्षिण कोरियातील इंचॉन येथे आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. २०१८ साली राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते.
पुनरागमनानंतर खरी कमाल…
२०१२ साली मेरीने ऑलिम्पिक पदक जिंकले त्यानंतर तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने काही काळ खेलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ साली दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत तिने जोरदार पुनरगमन केले आणि युक्रेनच्या हन्ना ओखोटाला ५-० असे पराभूत करत यश प्राप्त केले. यानंतर एक वर्षानंतर तिने तिचे आठवे जागतिक पदकही मिळवले.





