#MCC : युवा क्रिकेटमधून बाऊन्सर हद्दपार होणार
Updated On:

लंडन – युवा फलंदाजांसाठी जीवघेणे ठरु शकतील असे बॉडीलाईन बाऊन्सर्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गेले काही दिवस सुरू आहे. त्यावर अनुकूल पाऊल उचलण्याचा निर्णय क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) घेतला आहे, अशी माहीती आयसीसीने दिली आहे.
आखूड टप्प्याचे चेंडू, पंचांचा कौल (युडीआरएस) यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदलांचे संकेत एमसीसीने दिले आहेत.
युवा गटातील स्पर्धामध्ये फलंदाजांसाठी घातक ठरू शकणारे आखूड टप्प्याचे चेंडू (बाऊन्सर्स) टाकण्यावर बंदी घालावी, अशी मागणी जागतिक क्रिकेट क्षेत्रातून गेले काही दिवस सातत्याने होत आहे.
जून महिन्यापर्यंत यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच मैदानावरील पंचांच्या निर्णय आढावा प्रणालीत (युडीआरएस) असणाऱ्या त्रुटींवर ही विचारविनिमय होणार आहे.





