Maharashtra Politics : ‘दोन्ही पक्ष महायुतीसोबत…’; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणार काँग्रेस नेत्याचं रोखठोक भाष्य, शरद पवारांच्या भूमिकेबाबत थेट म्हणाले…
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याने याबद्दल भाष्य करत मोठा दावा केला आहे.

Maharashtra Politics : ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुण्याहून मुंबईला गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रास जाणवू लागला. पवार यांची अनेक नेत्यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून कफ झाल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. अशातच काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याने याबद्दल भाष्य करत मोठा दावा केला आहे.
अजित पवार यांच्या पक्षात दोन गट निर्माण झाले असल्याचा दावा करत दोन्ही पक्ष येतील तरी ते महायुतीसोबत जातील असे वाटत नाही, असे विधान केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार असते तर जी १२ फेब्रुवारी तारीख सांगितली जाते, ती निश्चित झाली असती. असे रोखठोक भाष्य विलिनीकरणावर केले आहे.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले “अजित पवार यांच्या पक्षात दोन गट निर्माण झालेत. त्यामुळे मोठी उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष येतील तरी ते महायुतीसोबत जातील असे वाटत नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे हात दगडाखाली आहे. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची भूमिका असू शकते. मात्र, शरद पवार यांची भूमिका तशी असू शकत नाही.”
Munnabhai-3 : संजय दत्त आणि अर्शद वारसीची जोडी पुन्हा एकत्र; ‘मुन्नाभाई 3’ची अपडेट समोर






