जुलैमध्ये जन्माला या, भारताचा कर्णधार बना

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कसोटीपटू व आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्विट शेअर केले आहे, जे सध्या तुफान व्हायरल होत आहे.
जुलै महिन्यात जन्म घेतलेल्या दिग्गज भारतीय कर्णधारांचा उल्लेख केला होता. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 7 जुलै- महेंद्र सिंग धोनीचा, 8 जुलै-सौरव गांगुली, 10 जुलै-सुनील गावसकर. 9 जुलै ही तारीख बाकी आहे आता पाहू नवा कोण कर्णधार होतो ज्याचा जन्म या दिवशी झाला असेल.
July 7th- MS Dhoni
July 8th- Sourav Ganguly
July 9th- ?
July 10th- Sunil Gavaskar
The missing 9th. Somewhere, a future India captain and icon will be born or celebrating his birthday today.#JulyMePaidaHoJaaoCaptainBanJaao— Virender Sehwag (@virendersehwag) July 9, 2018
कदाचित भारतीय संघाचा भावी कर्णधार या दिवशी जन्म घेणार असेल किंवा कुठेतरी आपला वाढदिवस साजरा करत असेल.
त्याने पुढे हॅशटॅगमध्ये लिहिले होते की, जुलै महिन्यात जन्म घ्या आणि भारतीय संघाचे कर्णधार व्हा. आता धोनी, गांगुली यांचा वाढदिवस पार पडल्यानंतर गावसकरांच्या वाढदिवसापूर्वी त्याने हे ट्विट शेअर केले आहे.





