Border 2 । सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’मध्ये दिलजीत दोसांझची ‘एन्ट्री’

अभिनेता सनी देओल जेव्हा गदर 2 द्वारे मोठ्या पडद्यावर परतला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे मनापासून स्वागत केले. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता.
या चित्रपटानेही भरपूर नफा कमावला. ‘गदर 2’ च्या यशानंतर बॉर्डर 2 ची घोषणा करण्यात आली. प्रेक्षक या क्लासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे. भारतातील सर्वात मोठ्या युद्ध चित्रपटाच्या नावाने ‘बॉर्डर 2’चे प्रमोशन केले जात आहे. चित्रपटाची स्टारकास्ट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
View this post on Instagram
सनी देओल पुन्हा एकदा मेजर कुलदीप सिंग चांदपुरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे अशात आता पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझचे नाव ‘बॉर्डर 2’ शी जोडले गेले आहे. आता या चित्रपटात दिलजीत सनी देओलसोबत दिसणार आहे. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण दिलजीत चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग सिंगच्या सतत संपर्कात होता. चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टचेही अद्याप अनावरण झालेले नाही. त्याचबरोबर बॉर्डर 2 मध्ये दिलजीत कोणती आणि कोणती भूमिका साकारणार याची माहिती समोर आलेली नाही.
दिलजीत दोसांझने दिग्दर्शकासोबत यापूर्वी 5 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयुष्मान खुरानाच्या कास्टिंगबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव फायनल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आयुष्मानच्या नावावर अद्याप अंतिम शिक्का बसलेला नाही. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी देखील स्टारकास्टमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे.





