Pune News : राज्यासह संपूर्ण देशात गाजलेल्या बोपदेव घाट येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातून मोहन फडतरे याच्यासह ५ जणांची विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ससबळ पुराव्य अभावी निर्दोष मुक्तता केली. (Pune News) फडतरे याच्या वतीने ॲड. राहुल नायर यांनी कामकाज पाहिले. पीडितेने फडतरे याला प्रथमच न्यायालयात पाहिल्याचे सांगितले. तसेच, त्याची ओळख परेड घेण्यात आलेली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज सादर करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नाही. (Pune News) फडतरे हा अपंग असल्याचे नमूद करत त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद ॲड. नायर यांनी केला. त्यांना ॲड. प्रमोद धुळे, ॲड. तेजस सोनार आणि ॲड. दीपेंद्र तुपे यांनी सहकार्य केले. (Pune News) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने पीडितेच्या साक्षींमध्ये तफावत असल्याचे नमूद करत निकाल दिला. याप्रकरणी, अॉक्टोबर २०२० मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १५ वर्षीय पीडित आईसोबत भांडण झाल्याने घरातून निघून गेली होती. ती हरविल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोध घेतल्यानंतर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचे तिने सांगितले होते. (Pune News)