‘बूस्टर डोस’ हा करोनाला प्रतिबंध करण्याचा उपाय नाही – WHO
Updated On:

जिनेव्हा – बूस्टर डोस हा करोनाला प्रतिबंध करण्याचा उपाय नाही; असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. ज्या देशांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर करोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे त्याच देशांमध्ये बूस्टर डोस मोहीम सुरू करुन करोनाला थोपविता येणार नाही. बूस्टर डोस पेक्षा ज्या देशांमध्ये अद्याप पुरेसे लसीकरण झाले नाही त्या देशांना करोना प्रतिबंधक लसचे डोस पुरविणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
निवडक देशांमध्ये लसीकरण तसेच बूस्टर डोसची मोहीम राबविली आणि काही देशांना लस मिळालीच नाही तर करोना संकट संपणार नाही. उलट करोना विषाणूला संसर्ग पसरविण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी मिळत राहील. यामुळे बूस्टर डोस ऐवजी लसीकरण मोहिमेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.





