श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट

Sridevi Birth Anniversary | बॉलीवूडची सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त बोनी कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच मुलगी आणि अभिनेत्री खुशी कपूरही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. खुशीने आई आणि बहीण जान्हवी कपूरसोबतचा तिचा बालपणीचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
बोनी कपूर यांनी इनस्टाग्रामवर एडिटेड फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2012 मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातील आहे. हा फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोद्वारे आपले प्रेम व्यक्त करत बोनी कपूर यांनी ‘हॅपी बर्थडे माय लव्ह जान’ असे म्हंटले आहे. Sridevi Birth Anniversary |
View this post on Instagram
बोनी कपूर यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने ‘हॅप्पी बर्थडे हवा हवाई, आम्हाला तुझी आठवण येते,’ असे लिहिले आहे. तर सोशल मीडियावर चाहत्यांंनीही श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, वयाच्या 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. Sridevi Birth Anniversary |
हेही वाचा :
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, २१ दिवसांची फरलो





