‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई:- 32 आठवड्यांच्या गर्भपातास मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला परवानगी दिली आहे. नियमानुसार आतापर्यंत 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास परवानगी दिली जात होती. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
न्या. गौतम पटेल व न्या. एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली. बाळ जन्माला येऊ शकते हा वैद्यकीय बोर्डाचा अहवाल त्या कुटुंबाला दुःखात ढकलण्यासारखा आहे. त्या दुःखाची व मानसिक त्रासाची आपण कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे या गर्भपातास परवानगी दिली जात आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
गर्भधारणा कायम ठेवायची की नाही, हे निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे. तसेच हा निर्णय केवळ तिच्या एकटीचा आहे. गर्भात गंभीर विकृती आढळून आल्याच्या वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने ही परवानगी दिली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/chief-minister-eknath-shinde-will-provide-good-governance-to-citizens-through-e-governance/
विशेष म्हणजे, गर्भारपणाचा जवळजवळ शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे गर्भात गंभीर विकृती असली तरीही गर्भपात करण्यास परवानगी दिली जाऊ नये, असा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला होता. तो मान्य करण्यास नकार देऊन खंडपीठाने उपरोक्त मत नोंदवले. तसेच याचिकाकर्त्या महिलेला गर्भपातासाठी परवानगी दिली.





