Bombay High Court Bomb Threat – दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण कॅम्पसची तपासणी करत आहेत. खबरदारी म्हणून, सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि अभ्यागतांना न्यायालय परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. दरम्यान, तपासणीत काहीही संशयास्पद आढळून न असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बची धमकी मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना दुपारी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण न्यायालयाचा परिसर रिकामा केला. याप्रसंगी बॉम्बच्या धमकीनंतर, शोध मोहीम राबवण्यात आली आहे आणि परिसर रिकामा करण्यात आला. खबरदारी म्हणून, सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि अभ्यागतांना न्यायालय परिसर तात्काळ रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कसून तपासणी करण्यात आली. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. यामुळे तो ईमेल खोटा असल्याचे निष्पन्न झाले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या तपासणीनंतर सर्वांना आत प्रवेश देण्यात आला आणि न्यायालयाचे कामकाज सामान्यपणे सुरू करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.