Mumbai Press Club : ‘मुंबई प्रेस क्लब’ला बॉम्बची धमकी; ई-मेलमुळे मोठी खळबळ, पोलिस यंत्रणा सतर्क
मुंबईतील 'मुंबई प्रेस क्लब'ला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.

Mumbai Press Club – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून धमकीच्या घटनांची मालिका सुरू असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील ‘मुंबई प्रेस क्लब’ला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी (१९ मार्च) सकाळी ७:३३ वाजता प्रेस क्लबच्या अधिकृत ईमेलवर पाठवलेल्या संदेशात क्लबच्या परिसरात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. Mumbai Press Club
घटनास्थळी बॉम्ब शोधक व निवारण पथक (BDDS) तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील हालचालींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
प्राथमिक तपासात हा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. ईमेलमध्ये काही अधिकृत स्वरूपाचे दावे करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Mumbai Press Club
दरम्यान, हा ईमेल प्रोटॉन मेलद्वारे पाठवण्यात आल्याची शक्यता असून सायबर क्राइम विभागाकडून त्याचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणताही स्फोटक पदार्थ आढळलेला नसला तरी पोलिसांनी उच्च सतर्कता ठेवली आहे.
बीकेसी पासपोर्ट कार्यालयालाही याआधी धमकी : Mumbai Press Club
याआधी बुधवारी मुंबईतील Regional Passport Office Mumbai (बीकेसी) येथेही बॉम्बची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली होती. ईमेलद्वारे पाठवलेल्या धमकीत पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइडने भरलेले १९ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
हे बॉम्ब दुपारी १:३० वाजता स्फोट करतील, असा उल्लेख ईमेलमध्ये करण्यात आला होता. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले.
परिसर तातडीने रिकामा करून सखोल तपास करण्यात आला; मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला.
पासपोर्ट कार्यालयाला मिळालेले धमकीचे ईमेल तीन आयडींवर पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा सायबर तपास सुरू असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे.
मुंबईत सलग मिळणाऱ्या अशा धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.






