चेन्नई-मुंबई इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; करावे लागले इमर्जन्सी लँडिंग

Chennai-Mumbai Flight| चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एक चिठ्ठी सापडली. ज्यात ही धमकी देण्यात आली होती.
“चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5314 ला बॉम्बची धमकी मिळाली. मुंबईत उतरल्यानंतर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान रिकामे केले. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. विमानाची अद्याप चौकशी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत नेले जाईल,” असे एअरलाइन कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
अलीकडच्या विमानाला बॉम्ब धमकी मिळण्याच्या वारंवार घटना घडत आहेत. यापूर्वी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आता शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. Chennai-Mumbai Flight|
31 मे 2024 रोजी देखील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्लीहून श्रीनगरला येत असलेल्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण विमानतळ प्रशासन कामाला लागले आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला, मात्र काहीही सापडले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे समोर आले. मागील काही दिवसांपासून अशा घटना वारंवार घडत आहेत. Chennai-Mumbai Flight|
हेही वाचा:
Ayushmann Khurrana | अभिनेता आयुष्मान खुरानाने बजावला मतदानाचा अधिकार





