नवी दिल्ली : सोमवारी सकाळी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-११९ ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. ८ तास ३७ मिनिटांच्या उड्डाण वेळेनंतर, विमान मुंबईकडे वळवण्यात आले. विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ प्रवासी होते. एअर इंडियाने सांगितले की, विमानाच्या वॉशरूममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. सुरक्षा प्रोटोकॉल लक्षात घेऊन, विमान परत मुंबईला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान १०:२५ वाजता मुंबईत पोहोचले. एअर इंडियाचे विमान एआय119 ने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-2 वरून पहाटे १:४३ वाजता न्यू यॉर्कसाठी उड्डाण केले. आता ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता उड्डाणाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणाची आणि इतर आवश्यक मदत पुरवण्यात आली आहे. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमची टीम सतत जमिनीवर काम करत आहे. आमची सर्वोच्च प्राथमिकता प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.