Ramayana Movie : रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधला महत्वाचा सीन लीक; नेटकरी चांगलेच भडकले
'रामायण' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार

Ramayana Movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार असल्याने या चित्रपटाकडे देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Ramayana Movie)
अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’चा ११ सेकंदांचा सीन लीक झाला असल्याचा दावा करत एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र हा खरोखरच चित्रपटातील अधिकृत सीन आहे का? की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेला व्हिडिओ? याबाबत आता वेगवेगळे दावे समोर येत आहेत. (Ramayana Movie)
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाची अधिकृत झलक (फर्स्ट लुक/अनाउन्समेंट व्हिज्युअल) प्रदर्शित केली होती. (Ramayana Movie)
त्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक ११ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत असून, तो ‘रामायण’च्या ट्रेलरमधील किंवा चित्रपटातील सीन असल्याचा दावा काही युजर्सकडून करण्यात आला आहे.
Shocking 🚨🚨🚨#RanbirKapoor ‘s Scene From #Ramayana gets Leaked. ⚠️⚠️⚠️
The scene which was shown at the CinemaCon event is circulating on Reddit 🔴 pic.twitter.com/jqFBLDWe5e
— Always Bollywood (@AlwaysBollywood) July 1, 2026
व्हायरल व्हिडिओमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या वेशात धनुष्यबाण हातात घेऊन एका राक्षसावर बाण सोडताना दिसत असल्याचा भास होतो.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेकांनी तो आगामी ट्रेलरमधील दृश्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सीन लीक झाल्याची चर्चा रंगली.
The Ramayana Leak surfacing on internet today was an AI video 🎬😅 pic.twitter.com/EKZVAl0D6G
— Aadesh (@CineIndiaX) July 1, 2026
मात्र, या दाव्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. उलट अनेक सोशल मीडिया युजर्स आणि डिजिटल कंटेंट विश्लेषकांनी हा व्हिडिओ AI-जनरेटेड असल्याचा दावा केला आहे.
काहींनी या व्हिडिओची विस्तारित आवृत्तीही शेअर केली असून त्यामध्ये रणबीर कपूरचा प्रभू श्रीरामाच्या लूकमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केलेला अवतार असल्याचे सांगितले आहे.
सध्या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा संबंधित टीमकडून हा व्हिडिओ अधिकृत आहे किंवा तो लीक झाला आहे, याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ चित्रपटातील वास्तविक दृश्य असल्याचा दावा सध्या तरी पुष्टी झालेला नाही.
दरम्यान, ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून दुसरा भाग २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल, कुणाल कपूर, रवी दुबे, शीबा चड्ढा, काजल अग्रवाल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.






