isha talwar : “तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करतेय”; ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
महाराष्ट्रात अन्नभेसळ आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईमुळे FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

isha talwar : महाराष्ट्रात अन्नभेसळ आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईमुळे FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अन्नसुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर तपासणी आणि कारवाईला वेग दिला आहे. त्यांच्या कडक आणि थेट कार्यशैलीची सोशल मीडियावरही चर्चा होत असून, अनेकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा केवळ प्रशासकीय वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यांच्या कामाची दखल आता मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही घेताना दिसत आहेत. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘ईशा तलवार’ हिने सोशल मीडियावरील एका पोस्टमधून मुंढे यांच्या कामाचे कौतुक केल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये तिने त्यांच्या टीममध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
ईशा तलवारने कथितपणे आपल्या Instagram पोस्टमध्ये, ‘मी अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करत आहे,’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे स्वीकारल्यानंतर अन्नभेसळ, नियमभंग आणि बेकायदेशीर व्यवहारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी तपासण्या आणि छापेमारी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरही FDAकडून लक्ष दिले जात आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर नागरिकांनी जागरूक राहण्याचे आणि नियमभंग आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे मिळाली विशेष ओळख
‘ईशा तलवार’ ही हिंदी तसेच दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत काम करणारी अभिनेत्री आहे. मात्र, तिला देशभरात विशेष ओळख मिळाली ती ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधील ‘माधुरी यादव’ या भूमिकेमुळे. या मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
अभिनयासोबतच ईशा सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्यामुळे तिने तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केल्याची पोस्ट केल्याचा दावा समोर आल्यानंतर ती चर्चेत आली आहे. तिच्या या प्रतिक्रियेमुळे तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीची चर्चा मनोरंजनविश्वातही पोहोचल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा:





