Eknath Shinde: ‘वंदे मातरम्’ ऐवजी लागलं बॉलीवूडमधील गाणं; एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात भलतीच चूक
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही काही ओळी गायल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत वंदे मातरम् ऐवजी भलतच गीत सुरू झाल्याचा प्रकार समोर आला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बॉलिवूडमधील वंदे मातरम् गाणं सुरू झाल्याने काहींचा गोंधळ उडाला. मात्र त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासहित सर्व उपस्थितांनी बॉलिवूड गाण्यावेळी स्तब्ध उभे राहून सन्मान दिला. बॉलिवूडमधील वंदे मातरम् गीत संपल्यानंतर राष्ट्रगीत जनगणमन सुरू झालं.
नेमकं काय घडलं?
ठाण्यात महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषदेने एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात राष्ट्रगीत वंदे मातरमने होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सर्व जण उभे राहिले. वंदे मातरम गाणं सुरू केलं. Eknath Shinde
परंतु अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्या ‘पुकार’ चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे वाजलं. विशेष म्हणजे हे संपूर्ण गाणे होईपर्यंत सर्वजण स्तब्ध होते. इतकेच काय तर, उपमुख्यमंत्री यांनीही काही ओळी गायल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काहींना हा प्रकार लक्षात आले नसल्याचेही दिसत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ही तांत्रिक चूक कोणी केली, ही चर्चा आता सुरू झाली. Eknath Shinde
हेही वाचा:





