Vijay-Rashmika: “रश्मिका-विजयचा खास अंदाज; लग्न घडवणाऱ्यांचे मानले आभार”
Vijay-Rashmika : विजय आणि रश्मिकाने उदयपूर येथे थाटामाटात लग्न केलं होतं. या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती.

Vijay-Rashmika: दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाला २६ मार्च रोजी एक महिना पूर्ण झाला. या खास निमित्ताने दोघांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाला सुंदर बनवणाऱ्या महिलांचे आभार मानले आहेत.
विजय आणि रश्मिकाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे थाटामाटात लग्न केलं होतं. या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती. आता लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर या जोडीने त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणांच्या आठवणी पुन्हा एकदा शेअर केल्या आहेत. Vijay-Rashmika

Vijay Deverakonda Rashmika Mandanna
विजय देवरकोंडाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “आयुष्यात काही क्षण खूप खास असतात. आपण त्यांची नीट तयारी केली तर त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. आम्हीही आमचं लग्न तसंच खास बनवण्याचा प्रयत्न केला.” कामावर परतण्यापूर्वी त्यांनी या सगळ्या महिलांचे आभार मानणं महत्त्वाचं वाटल्याचंही सांगितलं. Vijay-Rashmika
लग्नाच्या तयारीत मदत करणाऱ्या ज्वेलरी डिझायनर अर्पिता आणि त्यांच्या टीमचं विजयने विशेष कौतुक केलं. त्याने सांगितलं की, “मी जे काही विचार मांडले, ते त्यांनी सुंदर वास्तवात उतरवलं. त्यांनी कधीही ‘हे शक्य नाही’ असं म्हटलं नाही.” रश्मिकानेही अर्पिताचे आभार मानत तिच्या कामाचं मनापासून कौतुक केलं.
View this post on Instagram
याशिवाय विजयने त्याची खास मैत्रीण ऐश्वर्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितलं की, लग्नाच्या प्रत्येक टप्प्यावर ऐश्वर्या त्यांच्यासोबत होती. तयारीपासून ते रिसेप्शनपर्यंत तिने सर्व गोष्टीत साथ दिली. तिच्या आभारासाठी विजयने रिसेप्शनला तिचीच ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या पैंजणाचा हार, कंगन आणि पैंजण म्हणून वापर करून त्याने तिचं योगदान खास पद्धतीने साजरं केलं.
रश्मिकानेही ऐश्वर्याबद्दल भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली की, “तू नेहमी माझ्यासाठी आधार आणि ताकद राहिली आहेस. तुझ्यामुळेच आमचं लग्न इतकं सुंदर झालं.”
लग्न यशस्वी करण्यामध्ये वेडिंग प्लॅनर प्रिया हिची भूमिका देखील महत्त्वाची होती. विजयने सांगितलं की, “प्रिया आमच्या आयुष्यात वेडिंग प्लॅनर म्हणून आली, पण लवकरच ती आमच्या कुटुंबाचा भाग बनली.” रश्मिकानेही तिचं कौतुक करत म्हटलं की, “आम्हाला जसं स्वप्नवत लग्न हवं होतं, तसं तिने प्रत्यक्षात आणलं.”
View this post on Instagram
शेवटी रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये सर्व महिलांचे आभार मानत लिहिलं की, “मला विश्वास बसत नाही की आमच्या लग्नाला एक महिना झाला आहे. हा प्रवास खूप सुंदर होता. या सगळ्या महिलांमुळेच आमचं लग्न इतकं खास बनलं.”
एकूणच, विजय आणि रश्मिकाने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या निमित्ताने भावना व्यक्त करत, त्यांच्या आनंदात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आभार मानलं आहे. Vijay-Rashmika





