Actress Rashmika Mandana : बॅक टू वर्क! लग्नानंतर लगचेच कामावर परतली रश्मिका ; दिग्दर्शकाने फोटो शेअर करत दिली माहिती
Actress Rashmika Mandana : लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच अभिनेत्री रश्मिका मंदाना कामावर रुजू झाली आहे.

Actress Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधली. या फेव्हरेट जोडीचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.
काही मोजक्याच लोकांना लग्नासाठी आंमत्रित करण्यात आले होते. त्यानंतर दोघेही भारतात परतल्यानंतर त्यांच्या रिस्पेशन सोहळ्यासाठी बॅालिवूड इंडस्ट्रसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. Actress Rashmika Mandana
आता लग्नानंतर काही दिवसांतच बॅक टू वर्क म्हणत रश्मिका मंदाना कामावर परतली आहे. मैसा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. पोस्टमध्ये चित्रपटाच्या सेटवरील एक दृश्य शेअर करत करण्यात आले आहे. Actress Rashmika Mandana
मैसा या चित्रपटाची चर्चा रश्मिकाचे लग्न होण्यापूर्वीपासून सुरू आहे. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही शेअर करण्यात आले होते. आता प्रत्यक्षात चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
‘मैसा’ हाय-ऑक्टेन इमोशनल अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, चित्रपटात रश्मिका एका वेगळ्या लूकमध्ये बघायला मिळणार आहे. जो तिने याअगोदर कोणत्याही चित्रपटात साकारलेला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले आहे. त्यांनीच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याचे पोस्टद्वारे सांगितले. Actress Rashmika Mandana

Rashmika Mandanna News Marathi
दिग्दर्शक रवींद्र पुले यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. त्यांनी सेटवरील एक फोटो शेअर करून रश्मिकाला टॅग केले. त्यांनी त्याला ‘मैसा. सुरुवात झाली आहे.’ असे कॅप्शन दिले. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट होते.
रश्मिका मंदाना ‘मैसा’ या चित्रपटासह अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असून, चाहते यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा : Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव ८ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; दुहेरी भूमिका साकारणार


