Sonakshi and Zaheer : सोनाक्षी-झहीरच्या घरातील पेटिंग पाहून नेटकरी चकित; ‘गायत्री मंत्र’ आणि ‘कलमा’ एकत्र
Sonakshi and Zaheer : सोनाक्षीच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया

Sonakshi and Zaheer : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला आणि तिचा पती झहीर इक्बालला लग्नात भेट म्हणून मिळालेल्या एका विशेष आर्टवर्कचा फोटो तिने शेअर केला आहे.
ज्यामध्ये तिच्या घराच्या भिंतीवर लावलेले एक मोठे आणि अतिशय सुंदर पेटिंग दिसत आहे. या पेटिंग बाह्यरेषा गडद काळ्या रंगात असून, त्याच्या मध्यभागी एक मोठा निळा ‘ओम’ काढलेला दिसत आहे.
विशेष म्हणजे, या ‘ओम’च्या आत ‘गायत्री मंत्र’ लिहिलेला आहे आणि त्याच्या अगदी खाली इस्लामी ‘कलमा’ कोरलेला आहे. एकाच चित्रात हिंदू आणि मुस्लिम धर्माचे हे सुंदर ऐक्य पाहून अनेकांनी पेटिंगचे कौतुक केले.
सोनाक्षीने हे पेटिंग शेअर करत लग्नाच्या वेळची एक आठवण सांगत लिहिले, “जेव्हा आमचे लग्न झाले, तेव्हा घरात एकीकडे पुजारी गायत्री मंत्र म्हणत होते, तर दुसरीकडे अजानच्या आवाजाने आमचे घर भरून गेले होते. या दोन्ही प्रार्थनांनी आमचं घर आनंदी बनवलं.
View this post on Instagram
यानंतर, आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीवर होतो, तेव्हा माझी मैत्रीण शुभिका शर्माने मला फोन केला. तिला आमच्या लग्नानिमित्त एक खास भेट द्यायची होती. तिने जेव्हा या पेटिंगची संकल्पना सांगितली, तेव्हा ते आम्हाला खूप आवडले.”
सोनाक्षीने पुढे सांगितले की, मैत्रीण शुभिका हिने या पेटिंगसाठी तिची ओळख आदिल बेदी नावाच्या एका अत्यंत प्रतिभावान कलाकाराशी करून दिली. आदिलने सोनाक्षी आणि झहीर यांच्या भावना समजून घेत, हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचे एकता साधणारे हे अप्रतिम पेटिंग तयार केले.
मला खात्री आहे की हे आमच्या आयुष्यात आणखी आनंद, प्रेम आणि शांतता घेऊन येईल. आता हे घर अतिशय परिपूर्ण आणि आशीर्वादाने भरलेले वाटते.” सोनाक्षीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. Sonakshi and Zaheer
दरम्यान, सोनाक्षी ही हिंदू कुटुंबातील आहे, तर झहीर इक्बाल हा मुस्लिम कुटुंबातील आहे. या दोघांनी २३ जून २०२४ रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केले होते. या जोडप्याने नुकतीच या वर्षी २३ जून रोजी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. Sonakshi and Zaheer
हेही वाचा:
Nitesh Rane : नितेश राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?





