Rashmika Mandana : ‘प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव आवडेलच असं नाही’; रश्मिका मंदानाने ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर
Rashmika Mandana : रश्मिका आणि विजय देवरकोंडा ‘राणाबली’ या चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Rashmika Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘राणाबली’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. काही सोशल मीडिया युजर्स तिच्या प्रेमळ आणि उत्साही वागण्याला ‘ओव्हरॲक्टिंग’ किंवा ‘क्रिंज’ म्हणतात. यावर तिने आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
रश्मिकाने सांगितलं की, चांगुलपणा ही कमजोरी नसून आजूबाजूला आधीच खूप नकारात्मकता आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव आवडेलच असं नाही. त्यामुळे काही लोकांना माझं वागणं आवडत नसेल तर ती त्यासाठी स्वतःमध्ये बदल करणार नाही. याद्वारे तिने तिच्या प्रेमळ वागण्याला कोणी ‘ओव्हरॲक्टिंग’ म्हटलं तरी त्याचा तिला फारसा फरक पडत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रश्मिकाने पुढे सांगितलं की, इतरांना खुश करण्यासाठी मी स्वतःला बदलू शकत नाही. या स्वभावामुळे मी स्वतः, तिचं कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक आनंदी असतील, तर माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे तिचं प्रेमळ वागणं केवळ चाहत्यांसमोरची प्रतिमा नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
रश्मिकाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा यानेही यावेळी सोशल मीडिया ट्रोलिंगवर भाष्य केलं. अनेकदा कलाकार किंवा प्रसिद्ध व्यक्तींबाबत सोशल मीडियावर विशिष्ट मत तयार केलं जातं आणि त्यामागे ठरावीक ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याची यंत्रणा काम करत असते, असे विजयने म्हटले आहे.
दरम्यान, रश्मिका आणि विजय देवरकोंडा लवकरच ‘राणाबली’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास






