Parineeti Chopra : परिणिती चोप्राने पती राघव चड्डांसोबत थेट विमानप्रवासादरम्यान साजरा केला करवा चौथ
Parineeti Chopra : प्रियांका चोप्रानेही शेअर केला होता किस्सा

Parineeti Chopra : बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी करवा चौथचा सण उत्साहात साजरा केला. शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रासह अनेक अभिनेत्रींनी सोशल मिडियावर फोटो देखील शेअर केले.
मात्र अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्डा यांनी हटके पद्धतीने करवा चौथ साजरी केली आहे. दोघं विमान प्रवासात असल्याने परिणीतीने विमानातच चंद्र पाहून उपवास सोडला. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये परिणीती खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला नमस्कार करत असल्याचे दिसते. नंतर राघव यांनी तिला पाणी देत तिचा उपवास सोडला. विमानातला हा करवा चौथ एकदम हटके आहे.
परिणीती कॅप्शन देत लिहिले, “आम्ही जिथे असू तिथे करवा चौथ. मग ते ३५ हजार फुटांवर का असेना…तू माझी सगळी स्वप्न पूर्ण करतो. बेस्ट मॅन, बेस्ट ह्युमन, बेस्ट बॉय!” परिणीतीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत कपलचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
असाच काहीसा किस्सा परिणीती चोप्राची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही शेअर केला होता. त्यानंतर आता परिणीती चोप्रानेही अशाच अनोख्या अंदाजात आपला करवा चौथचा उपवास पूर्ण केला.
दरम्यान, परिणीतीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ‘नीर’ ठेवण्यात आलं. त्याआधी परिणीती ‘अमर सिंह चमकीला’ सिनेमात दिसली होती. नुकतीच तिची ‘शक: ट्रस्ट नो वन’ सीरिज रिलीज झाली.
हेही वाचा:
Hidden Sugar In Foods: चहातील साखर बंद केली, तरी शरीरात जातेय शुगर? ‘हे’ पदार्थ खाताना रहा सावध!





