Alia Bhatt: “हे किती लाजिरवाणं आणि अपमानास्पद आहे”; आलिया भटच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…
Alia Bhatt : आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी सज्ज होताच तिच्याकडे कोणीही पाहिले नाही.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतेच ‘कान्स’मध्ये सहभागी झाली. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी सज्ज होताच तिच्याकडे कोणीही पाहिले नाही.
रेड कार्पेटसाठी आलियाने पीच रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. लॉरियलची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने ऐश्वर्या राय बच्चनप्रमाणेच तीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असेल, असं मानलं जात होतं. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. आलिया रेड कार्पेटवर आली तरी फोटोग्राफर्सना तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
फोटोग्राफर्स रेड कार्पेटवर उपस्थित असलेल्या दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो काढण्यात व्यस्त होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. (Alia Bhatt)
It’s is so embarrassing how Indian celebs carve international attention, here’s alia bhatt at cannes not even single cameraman was bothered to capture her, pic.twitter.com/BUUveNIbXB
— Aarohi (@hamlakroo) May 13, 2026
ती आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर आली, सगळ्यांना हात केला, फ्लाइंग किस दिली आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. मात्र नेटकऱ्यांचं लक्ष फोटोग्राफर्सकडे गेलं. एकही फोटोग्राफर तिचे फोटो काढत नसून सगळ्यांचं लक्ष भलतीकडेच आहे असं दिसत आहे. आलियाला कोणीच ओळखलं नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट (Alia Bhatt)
यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, ‘आलिया लक्ष वेधण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण तिला कोणीच ओळखत नाहीये. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे’, ‘हे पाहून खूप वाईट वाटतंय’, ‘खरंच आहे..कोणीच तिचे फोटो घेत नाहीये. ती सुद्धा ऑकवर्ड झाली आहे फक्त हसून टाळत आहे’, ‘हे किती लाजिरवाणं आणि अपमानास्पद आहे’, ‘ही नक्की कोणाकडे बघून हात दाखवतेय आणि फ्लाइंग किस देतेय?’, असा सवालही उपस्थित केला.
दरवर्षी ऐश्वर्या कान फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. मात्र आलियाबाबत एकदम वेगळे घडल्याचे दिसले.
हेही वाचा:





