Alia Bhatt : प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवाची मोठी उत्सुकता दरवर्षी चाहत्यांना असते. मोठ्या आतुरतेने महोत्सवाची वाट चाहते पाहत असतात. यंदाच्याही कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात १२ मे रोजी मोठ्या दिमाखात झाली आहे. बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनेही या महोत्सवाला हजेरी लावली असून तिने आपल्या कान्सच्या रेड कार्पेटवरील अनोख्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलियाने कान्सच्या रेड कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शवली. पीच रंगाच्या (फिकट गुलाबी) गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी उपस्थित असणाऱ्यांपैकी अनेकांच्या नजरा तिच्यावर खेळून राहिल्या होत्या. या ड्रेसला सुट होईल असा मॅचिंग नेकलेस घालून आपला लूक तिने पूर्ण केला. तिचे केस मोकळे असून तिची हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. आलियाने तिच्या स्टायलिश लूकमध्ये परिधान केलेल्या गाऊनसोबत एक दुपट्टाही परिधान केला होता आणि तो तिने मोठ्या दिमाखाने मिरवला. हा दुपट्टा ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर तमारा राल्फ यांनी डिझाइन केला असून रिया कपूरने स्टाईल केला होता. यामुळेच आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक आगळावेगळा ठरला आहे. पण सोशल मीडियावर बहुतेक नेटकऱ्यांना तिचा आधीचा लूक खूप जास्त आवडला असल्याचे दिसते. नेटकऱ्यांनी लिहिले आहे, “आधीचा लूक अधिक चांगला होता.” काही नेटकऱ्यांना तिचा हा पीच रंगाचा गाऊन लूक अजिबात आवडला नसला तरी, आलियाचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रेड कार्पेटवर येण्यापूर्वी आलियाचा आणखी एक लूक व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती एका बहुरंगी गाऊनमध्ये दिसली होती. आलिया भट्टने गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. कामाच्या आघाडीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आलिया ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘अल्फा’ हा चित्रपटही आहे. हेही वाचा : PM modi convoy: पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ; ताफ्यातील गाड्या केल्या निम्म्याने कमी