Ankita Lokhande : ‘गुड न्यूज आहे का?’ अंकिता लोखंडेने दिली अशी रिअॅक्शन
Ankita Lokhande : यापूर्वीही अंकिता आणि विकीच्या आई-बाबा होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

Ankita Lokhande : टीव्ही विश्वात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी सध्या ‘लाफ्टर शेफ्स सीझन ३’ मध्ये दिसत आहे. लाफ्टर शेफ्सच्या शूटवर या दोघांचा अंदाज अत्यंत खास असतो. कॅमेऱ्यासमोर दोघांची केमिस्ट्री आणि बाँडिंग खूपच गोड दिसत होती.
मात्र अनेकदा अंकिता आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लाफ्टर शेफ्सच्या शूटवर जेव्हा अंकिता आणि विकी पोहोचले, असता मागून एकाने “गुड न्यूज येणार आहे का?” असा प्रश्न केला. त्यावर दोघेही कोणतेही उत्तर न देता, केवळ पोझ देऊन निघून गेले. Ankita Lokhande
यापूर्वीही त्यांच्या आई-बाबा होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. पण अंकिताने स्वतः या गोष्टीची पुष्टी केली होती की ती सध्या प्रेग्नंट नाही आणि जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा ती स्वतः याचा खुलासा करेल.
विकी आणि अंकिताचे नाते
अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्न केल्यानंतर दोघे ‘बिग बॉस १७’ मध्ये एकत्र दिसले होते. तसेच स्टार प्लसच्या ‘स्मार्ट जोडी’ मध्येही त्यांनी आपली जादू दाखवली होती आणि आता ते ‘लाफ्टर शेफ्स’ मध्ये काम करत आहेत.
हेही वाचा:






