Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क
Vidyut Jammwal: विद्युत 'स्ट्रीट फायटर'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार

Vidyut Jammwal: बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता तो ‘स्ट्रीट फायटर’ या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला विद्युतने हजेरी लावली होती. ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Vidyut Jammwal)
चित्रपटात विद्युत पुन्हा एकदा पडद्यावर दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे. पडद्यावर धमाकेदार ॲक्शन करण्यापूर्वी अभिनेत्याने चाहत्यांना लाइव्ह स्टंट दाखवला. विद्युतने स्टेजवर आपल्या योगसाधनेचे आणि आत्म-शिस्तीचे प्रदर्शन दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्युत हा योग आणि मार्शल आर्ट्स मास्टर आहे. जे त्याने पुन्हा एकदा या व्हीडिओच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. (Vidyut Jammwal)
View this post on Instagram
डोळ्यांतून पाणी आणि शरीरही थरथरताना दिसले (Vidyut Jammwal)
त्याने तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला आणि 20 मिनिटे डोळ्याची पापणी न लवता एकाच ठिकाणी उभा राहिला. यादरम्यान त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले आणि त्याचे शरीरही थरथरताना दिसले. विद्युत जामवालला पाहून सगळेच थक्क झाले. त्याच्या या कृतीमुळे त्याची मानसिक ताकद आणि संयम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Vidyut Jammwal)
विद्युतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण त्याच्या एकाग्रतेचे कौतुक करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. दरम्यान, विद्युत ‘स्ट्रीट फायटर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा १६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा:





