Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Ladki Bahin Yojana: तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याचा ₹1,500 चा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नसून, या हप्त्याची प्रतीक्षा अनेकांना आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने अनेकांकडून याबाबत विचारणा केली जात आहे. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, राज्य सरकार आज सप्टेंबर महिन्याच्या हप्तावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वितरित करायचा यावरही निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता सरकार 20 किंवा 25 तारखेनंतर महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरू करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र असल्याने सणासुदीच्या या काळात महिलांना आर्थिक मदत करत दिलासा दिला जाऊ शकतो.
यापूर्वीही राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते विविध सणांचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात जमा केले होते. यावेळी देखील राज्य सरकार दसऱ्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करु शकते. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे.
हेही वाचा:
By election 2026 : चार राज्यांत आज पोटनिवडणुकीचा रणसंग्राम ; ५ विधानसभा, १ लोकसभा जागेसाठी मतदान





