Suraj Chavan Video : लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज.! सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? ‘तो’ व्हिडिओ आला समोर…
Suraj Chavan Video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जेजुरीला दर्शनासाठी गेल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती सूरज चव्हाणच्या घरी जाताना आणि नंतर संजनाला भेटताना दिसते.

Suraj Chavan Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टिक टॉक व्हिडीओंमधून लोकप्रियता मिळवत आणि नंतर सिनेमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सूरजचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर सध्या विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर 2025 रोजी संजना सोबत विवाह केला होता. हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाले असून, त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. (Suraj Chavan Video)
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संजनाचा एक क्षण दिसतो, ज्यावरून काही नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नेंसीबाबत अंदाज लावायला सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Suraj Chavan Video)
View this post on Instagram
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर जेजुरीला दर्शनासाठी गेल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती सूरज चव्हाणच्या घरी जाताना आणि नंतर संजनाला भेटताना दिसते. तसेच मंदिरात दर्शन घेतानाचे व्हिडीओमध्ये आहेत.
या व्हिडीओनंतर संजनाच्या स्थितीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी कमेंट करत “गोड बातमी येणार का?” असे अंदाज बांधले आहेत, तर काहींनी व्हिडीओतील काही क्षणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Suraj Chavan Video)
मात्र, या संपूर्ण चर्चांवर सूरज चव्हाण किंवा संजना यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा या केवळ अंदाज आणि व्हायरल कंटेंटवर आधारित आहेत. ( Suraj Chavan Video)





