Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानने शेअर केला बालपणीचा फोटो; करीना कपूर म्हणाली…
Saif Ali Khan : बालपणीचा सैफ अली खानचा लूक आणि त्याचा लेक तैमूरच्या चेहऱ्यामध्ये साम्य

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने इन्स्टाग्रामवर त्याचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर चाहते सैफची हुबेहूब तुलना त्याचा आणि करीना कपूर खानचा मुलगा ‘तैमूर अली खान’ याच्याशी करत आहेत. या खास फोटोवर खुद्द करीना कपूरही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. तिने केलेल्या एका कमेंटनंतर सर्वांनाच सैफच्या बालपणीच्या फोटोत थेट तैमूरची झलक पाहायला मिळत आहे.
सैफने शेअर केलेल्या हाप फोटो तो ५ ते ६ वर्षांचा असतानाचा असल्याचा अंदाज आहे. स्वतःचा हा बालपणीचा फोटो पाहून सैफलाही त्यावर विश्वास बसत नाहीये. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे: ‘काय हा मी आहे? १९७५ बॉम्बे, कारमाइकल रोड, आईचे टेरेस आणि माझा फेव्हरेट शर्ट.’ हा फोटो घराच्या छतावरचा असून, यात सैफ पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे, ज्यावर काळ्या रंगाचे प्रिंट्स आहेत. हा शर्ट आपला सर्वात आवडता असल्याचे त्याने सांगितले आहे.
View this post on Instagram
करीना कपूर आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या पोस्टवर करीना कपूरच्या कमेंटने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. सैफच्या बालपणीचा लूक आणि त्याचा लेक तैमूर यांच्यातले साम्य पाहून तिने आपल्या मुलाची आठवण काढली. तैमूरला घरात प्रेमाने ‘टिम’ नावानेही हाक मारली जाते. तिने फोटोवर कमेंट केली की, ‘हा माझा टिम आहे का?’ तसेच, अभिनेत्री सोनम कपूरसह अनेक चाहत्यांनीही कमेंट करत सैफ आणि तैमूर यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा:





