फरहान अख्तरला ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी मिळेना ‘अभिनेता’

bollywood news । अभिनेता फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा आगामी चित्रपट विविध कारणांमुळे बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकलला जात आहे. प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, मात्र वेळोवेळी कोणीतरी चित्रपट सोडल्याच्या बातम्या येत आहे. बऱ्याच दिवसांनी चित्रपट पुढे ढकलण्याचे खरे कारण आता समोर आले आहे.फरहान अख्तरला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यासाठी पुरुष ए-लिस्टर सापडत नाही आहे. यामुळेच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होत नाहीये.
रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर त्याच्या चित्रपटासाठी खूप वचनबद्ध आहे. डॉन 3 नंतर तो ‘जी ले जरा’ या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. पण चित्रपट बनवताना सर्वात मोठी अडचण ही आहे की चित्रपटासाठी पुरुष कलाकार मिळत नाहीत. फरहान अख्तरला चित्रपटात 3 ए-लिस्टर्स कास्ट करायचे आहेत, परंतु यासाठी आता पर्यंत अभिनेता मिळत नाही आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.
‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा 2021 मध्ये झाली होती. ही 3 मुलींच्या रोड ट्रिपची कथा असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. या चित्रपटाचे लेखन झोया अख्तरने केले आहे. त्याचे निर्माते रीमा कागती, झोया अख्तर, रितेश सिधवाना आणि फरहान अख्तर आहेत.





