छत्रपती संभाजीराजेंबाबत बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त पोस्ट; CM फडणवीसांनी घेतली महत्त्वपूर्ण भूमिका

Devendra Fadnavis Reaction On KKR | छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. त्याने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे देशभरातून कौतुक केले जात आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. केकेआरचं हे ट्वीट ‘छावा’ चित्रपटासंदर्भात आहे.
केकेआरनं 17 फेब्रुवारीला केलेल्या ट्वीटमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या आणि आक्षेपार्ह्य गोष्टी लिहिलेल्या होत्या. काही काळातच केकेआरनं ‘छावा’संदर्भात केलेली पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपीडियाला छत्रपती संभाजी महाराजांबाबतची आक्षेपार्ह्य माहिती हटवण्याचे आदेश दिले. Devendra Fadnavis Reaction On KKR |
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विकीपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह्य मजकूराबाबत बोलाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.” Devendra Fadnavis Reaction On KKR |
“मी सायबरच्या आयजींना विकिपीडियावरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांना विकिपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडिया भारतातून चालवले जात नाही. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे योग्य नाही. त्यासंदर्भात काही नियम तयार करा, असा सल्ला त्यांना देऊ शकतो”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis Reaction On KKR |
दरम्यान, ‘छावा’मधून छत्रपती शंभू राजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर सादर करण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा:
मंत्रिमंडळातील गोपनीय माहिती उघड ; देवेंद्र फडणवीसांचा पारा चढला ; ‘फितुरां’ना कारवाईचा दिला इशारा






