बोल्ड आणि हॉट अदा..! कियाराचा गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक

मुंबई – ‘धोनी’ आणि ‘कबीर सिंह’ यांसारख्या सिनेमांनंतर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून कियाराच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. बॉलिवूड मध्ये एक आघाडीची नायिका म्हणून “कियारा अडवाणी’कडे पाहिलं जातं.
कियाराने या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाईफ या दोघांचाही उत्तम मेळ घालत ती काम करताना दिसत आहे. अश्यातच, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये कियारा रँपवॉक करताना दिसत आहे.
नुकतंच कियाराने ‘India Couture Week 2023’ मध्ये डिजाइनर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या कलेक्शनसाठी रँपवॉक केला. या इव्हेंटमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता, त्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि मादक दिसत होती. याच इव्हेंटमधील तिच्या रँपवॉकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. फॅन्स देखील अभिनेत्रीचं कौतुक करताना दिसत आहे.
2016 मध्ये आलेल्या MS धोनी: द अनटोल्ड स्टोरी या दिवंगत सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या सह कियाराने प्रसिद्धी मिळवली होती. तेव्हा पासून अभिनेत्री चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.





