कोर्लई समुद्रात दिसलेली बोट पाकिस्तानी असल्याचा संशय; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Raigad Boat | रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रात एक संशयित बोट आढळून आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी होती. पोलीस या बोटीचा तपास घेत असून समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन नॉटिकल मैलांवर समुद्राच्या समपातळीला लाल रंगाचा लाईट दिसत होता. परंतु तो लाईट आता मात्र तिथं दिसत नाही. रात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या मात्र आता त्यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर आलेली नाही. बोटीवर असलेल्या चिन्हावरून ती पाकिस्तानी असल्याचा संशय असून मोठ्या बोटीतून काही व्यक्ती लहान बोटीत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. Raigad Boat |
याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्रीच या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री देखील पोलीस यंत्रणा, नेवी आणि कोस्टगार्डकडून शोध घेण्यात आला, मात्र बोट कुठेही आढळून आली नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला, पण बोट त्याठिकाणी नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता नेवी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीचा शोध घेत आहे. या बोटीची संशयास्पद हालचाल रडारवर दिसून येत होती.
पर्यटकांची मोठी गर्दी
कोर्लई किल्ला आणि नजीकच्या परिसरात सुट्ट्यांच्या निमित्तानं पर्यटकांची मोठी गर्दी असते. याशिवाय मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब या कोर्लई गावात आहेत. येथून सागरी प्रवासमार्गे मुंबईसुद्धा अधिक जवळ आहे. या कारणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तपास यंत्रणाकडुन याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. Raigad Boat |
हेही वाचा:
ट्रम्पकडून ‘ब्रिक्स’ देशांना टॅरिफची धमकी ; अमेरिका भारतावरही कर वाढवणार का? वाचा





