बीएमडब्ल्यूने 2024मध्ये भारतात विकल्या 15721 कार
Updated On:

नवी दिल्ली – बीएमडब्ल्यू या जर्मनीच्या कंपनीची भारतातील 2024 मधील विक्री वाढून 15,721 युनिट झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या विक्रीत 11 टक्क्यांची वाढ झाली असून आतापर्यंत कंपनीने केलेली ही सर्वाधिक विक्री आहे असे या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या वर्षात बीएमडब्ल्यू ब्रँड अंतर्गतची 15,012 वाहने विकली. तर मिनी ब्रँड अंतर्गत 709 वाहनांची विक्री झाली. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बीएमडब्ल्यूच्या 8,301 मोटरसायकल विकल्या गेल्या. या आकडेवारी बद्दल बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह यांनी समाधान व्यक्त केले.





