मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पडघमात आज प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या ३१ जानेवारी २०२५ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले. या सोडतीमुळे अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम झाला असून, त्यांना दुसऱ्या वॉर्डातून निवडणूक लढवावी लागणार किंवा विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट), भाजप, शिंदे गट आणि इतर पक्षांच्या नेत्यांना याचा फटका बसला. ठाकरे गटाला बालेकिल्ल्यातच धक्का.. आजच्या आरक्षण सोडतीचा फटका सर्वात जास्त ठाकरे गटाला बसला आहे. दादर-माहीम हा भाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या ठिकाणाहून दोन माजी महापौरांना आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांचा वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाला आहे. मागच्या वेळी हा वार्ड खुल्या गटासाठी होता. त्याशिवाय, उत्तर मुंबईत दहिसर भागात तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्डदेखील ओबीसींसाठी राखीव झाला आहे. कोणत्या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांना बसला धक्का? माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या, वरळीत ठाकरे गटाचे आशिष चेंबुरकर, ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभागप्रमुख सुरेश पाटील, ठाकरे गटाच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव, भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा या दिग्ग्ज नेत्यांना आजच्या आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. कोणाचे वॉर्ड आरक्षित? १३३ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक परमेश्वर कदम शिंदे गट १८३ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक गंगा माने १४७ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक अंजली नाईक (ओबीसी) १८६ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक वसंत नकाशे (ठाकरे गट) ओबीसी १५५ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये – ठाकरे गट (SC राखीव) ११८ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक उपेंद्र सावंत १५१ – महिला वॉर्ड माजी नगरसेवक राजेश फुलवारिया १८९ – महिला वॉर्ड – माजी नगरसेवक हर्षदा मोरे २०८ – ओबीसी – माजी नगरसेवक रमाकांत रहाटे ७२ – ओबीसी – माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ – ओबीसी) १७० – ओबीसी – माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP) १७६ – ओबीसी – माजी विरोधी पक्ष नेता – रवी राजा १९१ – ओबीसी – माजी नगरसेवक विशाखा राऊत १०८ – ओबीसी – माजी नगरसेवक नील सोमय्या ११७ – ओबीसी – माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे १७१ – ओबीसी – माजी नगरसेवक सानवी तांडेल १- ओबीसी – माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर २२६ – ओबीसी – माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर १८२ – ओबीसी – माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट २०८ – ओबीसी – माजी नगरसेवक रमाकांत रहाटे ८७ – ओबीसी – माजी नगरसेवक – विश्वनाथ महाडेश्वर (निधन) १५३ – ओबीसी – माजी नगरसेवक अनिल पठाणकर १९३ – ओबीसी – माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर