BMC Election 2026 : मुंबईत निवडणूकीसाठी २५ हजारहून अधिक पोलीस तैनात
Updated On:

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) निवडणुक आणि मतमोजणीवर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २५,००० हून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईत तैनात केले जाणार आहेत.
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा व्यवस्थेमध्ये १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि ८४ सहायक पोलीस आयुक्तांचा (एसीपी) समावेश असेल.
२२७ सदस्यांच्या बीएमसीसाठी मतदान गुरुवारी होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांव्यतिरिक्त, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), डेल्टा फोर्स, दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र प्रतिसाद पथके (क्यूआरटी) यांनाही संपूर्ण महानगरात निवडणूक कर्तव्यासाठी तैनात केले जाणार आहे.





