BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; आगामी अर्थसंकल्पात १४ टक्क्यांनी वाढ

BMC Budget 2025 – मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ७४४२७.४१ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला.
चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान ९२४६.६२ कोटी रुपयांनी अधिक असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षात सुशोभिकरण, रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रीटीकरण, त्याचबरोबर हाती घेतलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागला आहे. महापालिकेच्या ठेवी त्यासाठी मोडाव्या लागल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन महसूलवृद्धीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील प्रमुख तरतूदी :
-महसुली उत्पन्नात 410 कोटींची वाढ अपेक्षित
-महसुली खर्चात 75 टक्क्यांवरून 42 टक्क्यापर्यंत कपात
-भांडवली खर्चात 25 टक्क्यांवरून 58 टक्क्यापर्यंत रु. 43000 कोटी वाढ
-उत्पन्नाच्या स्त्रोतात विविध मार्गाने 3000 कोटी पर्यंत वाढ अपेक्षित
-गुंतवणुकीवरील व्याज दरात अर्धा टक्का वाढ
-प्रीमियम एफ.एस.आय. शुल्कापैकी 50 टक्के वाटा महापालिकेस 300 कोटी अपेक्षित
-व्ही.एल. टी. टू लीज धोरणा अंतर्गत 2000 कोटी वाढ अपेक्षित
-अग्निशमन शुल्काद्वारे 769 कोटी उत्पन्न अपेक्षित
-टोल नाक्याच्या रिकाम्या जागांचा पार्किंग व अन्य व्यावसायिक वापर
-झोपडपट्टीतील व्यावसायिक आस्थापनावर मालमत्ता कर आकारणी
-प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर पॅनल महापालिकेच्या मालमत्तांसाठी राबविणारा





