निळी साडी, नाकात नथ….; अंकिता लोखंडेंचा मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली. यानंतर तिने चित्रपटात देखील काम केले. सध्या अंकिता ‘लाफ्टर शेफ सीझन २’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. या शोच्या पुढील भागाच्या चित्रीकरणासाठी अंकिताने खास लुक केला होता. जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये अंकितानं निळ्या रंगाची साडी नेसली असल्याचं पाहायला मिळालं. त्यावर साजेसे पारंपरिक मराठमोळे दागिने तिनं परिधान केल्याचे दिसले. अंकिताचा हा लूक पाहून तिचे कौतुक केलं. यावेळी अंकिता पापाराझींना म्हणाली, “माहीत नाही कुणाचं लग्न आहे. पण मला असं वाटतं की, माझं रोजच लग्न आहे.”
त्यानंतर अंकिता पापाराझींना जय महाराष्ट्र म्हणून कार्यक्रमाच्या सेटकडे जाताना दिसली. सध्या त्याचा हा मराठमोळा अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
;
‘लाफ्टर शेफ सीझन २’ या कार्यक्रमामध्ये अंकितासह तिचा नवरा विकी जैन पाहायला मिळाला. याशिवाय करण कुंद्रा, कृष्णा अभिषेक, अली गोनी, निया शर्मा व रीम शेख हे कलाकारही पाहायला मिळत आहेत. यातील कलाकारांनी अनेकदा बॉलीवूड लुक केल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. Ankita Lokhande |
दरम्यान, अंकिता लोखंडे बिग बॉस सीझन १७ या शोमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती रणदीप हुडासह ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात झळकली होती. तसेच ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाशी’, ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. Ankita Lokhande |
हेही वाचा :
पाकिस्तानची धडपड! ‘शिमला करारा’तून पलायन? ; काय आहे हा करार आणि त्याचे संभाव्य परिणाम, वाचा सविस्तर





