satara | वाई अर्बन बँकेतर्फे 75 रक्तदात्यांकडून रक्तदान

वाई, (प्रतिनिधी) – येथील दि वाई अर्बन को. आँप. बँकेच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. माऊली रक्तपेढीचे डाँ. गिरिश पेंढारकर, डाँ. रमन भट्टड, अजित कुबेर, माधव प्रभुणे व त्यांचे सहकारी यांनी रक्तसंकलन केले.
शनिवारी वाईत माऊली रक्तपेढीच्या सहकार्याने शिबीर घेण्यात आले. बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्याचे बँकेने ठरविले होते. संचालक चंद्रकांत गुजर यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वाईतील प्रधान कार्यालयायील अधिकारी, संचालक व बँकेचे ग्राहक, व्यापारी असोसिएशनचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी यात सहभाग घेतला. दुपारपर्यंत 75 मान्यवरांनी रक्तदान केले.
त्यामध्ये सामाजिक जाणीवेचे भान ठेवून बँकेचे ज्येष्ठ संचालक विवेक पटवर्धन, मकरंद मूळये, अशोक लोखंडे, प्रितम भूतकर यांनी स्वतः रक्तदान करून यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. सहभागी रक्तदात्यांना माऊली पतपेढीच्यावतीने सन्मानपत्र देण्यात आले.
बँकेचे संचालक माधव कान्हेरे, रमेश भुरमल, काशीनाथ शेलार, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक सीए. प्रवीण आवटे आदी याप्रसंगी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे यांनी आभार मानले.





